मॉन्सून आता काही
दिवसांतच देशांत दाखल होणार आहे. महाराष्ट्रांतही तो जूनच्या पहिल्या आठवड्यांत
येण्याची शक्यता आहे. पाऊस येईल पण त्यासोबतच तो साठवण्याची आपली जबाबदारी आपणही
विसरायला नको. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आपण करू यात. पाऊस येण्यासाठी झाडे
महत्त्वाची भूमिका करत असत. या झाडांचं रक्षण करणं, संवर्धन करणं आपल्या सर्वांचच
कर्तव्य आहे. त्यासाठी आणखी एक उपक्रम यावेळी काही लोक राबवत आहेत. तो आहे
बीजचेंडू किंवा सीड बॉल्सचा. ओल्या मातीत वेगवेगळ्या झाडांच्या बीया टाकून हे गोळे
तयार करण्यात येतात. हे गोळे मग ठिकठिकाणी फेकण्यात येतात जिथं पावसानंतर
त्यांच्यातून झाडे निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या परिसरात जर कोणी
असा उपक्रम करत असेल तर त्यात नक्की सहभाग घ्या. किंवा तुम्ही स्वतःच असा उपक्रम
करण्यासाठी पुढाकार घ्या. तेव्हा या पावसाळ्यात पावसाचा आनंद घ्या आणि नवी झाडं
तयार करण्यासाठी चढाओढीनं काम करा.
No comments:
Post a Comment