मॉन्सून आता जवळच
आहे. पाऊस याही वर्षी चांगला पडण्याची शक्यता आहे. पण हे पाणी वाया जाण्याची
शक्यता त्याहूनही जास्त आहे. लोकांचा आजवरचा अनुभव बघता पाऊस चांगला झाला तर ते
पाणी साठवून न ठेवण्याकडेच लोकांचा कल जास्त असू शकतो. आजवर आपण नाही तरी हेच करत
आलोय. पण ही घाणेरडी व जीवघेणी सवय आता बदलूया. पाऊस पडणार नाही तेव्हा तर पाणी
वाचवूच पण पाऊस जेव्हा पडेल तेव्हा तो वाचवूया म्हणजे पाण्यासाठी वणवण फिरण्याची
पाळी आपल्यावर येणार नाही. ज्यांना गरज आहे ते लोक पाणी वाचवतीलच पण ज्यांना तशी प्रत्यक्ष
गरज नाही अशा शहरातील लोकांसाठी हे आवाहन आहे की त्यांनीही पाणी साठवण्यासाठी थोडे
प्रयत्न तरी नक्कीच करावेत. गरजेपेक्षा जास्त पाणी न वापरणं, पाण्याची उधळपट्टी
थांबवणं, इतरांना त्यासाठी प्रोत्साहित करणं, सामाजिक माध्यमांवर पाणी-जागृती करणं
यांतून पाणी संवर्धनाची मोहिम शहरी लोक नक्कीच चालवू शकतात. वाचवलेल्या
पाण्यासोबत, पाणी वाचवण्यासाठी केलेल्या उपक्रमांसोबत स्वतःचा सेल्फी काढून तो
पोस्ट करा. असा सेल्फी ही नक्कीच अभिमानाची व आनंदाची गोष्ट ठरेल. तुमच्यासाठी आणि
त्यांच्यासाठीही ज्यांना तुम्ही वाचवलेल्या पाण्यामुळे दिलासा मिळेल. सो लेट्स डू
इट. लेट्स क्लिक सेल्फी विद पाणी.
No comments:
Post a Comment