लोकांना आनंद
देण्याचे अनेक प्रकार आहेत. पण एक वाचक आणि लेखक म्हणून मला इतरांना आनंदी
करण्याचा मार्ग त्यांच्याशी पुस्तकांबदद्ल बोलणं हा वाटतो. मी ज्यांना भेटतो
त्यांना मी वाचलेल्या पुस्तकांची माहिती देतो, त्यांनी काय वाचन केलं ते जाणून
घेतो, माझ्या लिखाणाची चर्चा करतो, त्यांच्याकडून त्यावर मतं मागवतो. माझ्यासाठी
पुस्तकांसंबंधीचं कसलंही बोलणं आनंदाचं असतं. दुर्देव्यावं आपल्याकडे हा आनंद
देणारे आणि घेणारे यांची संख्या फारच कमी आहे. वाचनाची अभिरूची असणं हे मानवतेचंही
एक दृष्य लक्षण असतं. ते केवळ मनोरंजन नाही तर माणूस घडवण्याचं माध्यम आहे
त्यामुळे वाचन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असायलाच हवा. त्यासाठी जमेल ते
सर्व प्रयत्न आपण करायलाच हवेत.
हाच उद्देश मनात
घेऊन पुण्यात काही उत्साही लोकांनी ‘बिईंग फाउंडेशन’ नावाची संस्था सुरू केली आहे. लोकांना पुस्तकं
वाटून त्यांना आनंदी करायचं हा त्यामागचा उद्देश. आणि आनंदी करण्यासाठी लहान
मुलांइतकं पात्र कोण असणार बरं? त्यामुळे लहान
मुलांना आनंदी करण्याचा वसा या लोकांनी उचलला आहे. पुस्तकं देऊन या मुलांच्या
चेह-यावर हसू फुलवण्याचं काम ही मंडळी करत आहे. त्यासाठी त्यांनी ‘वन बुक वन स्माईल’ नावाची
मस्त योजना सुरू केली आहे. यात तुम्ही काय करायचं तर तुमच्या जवळचे इकडे तिकडे
उगाच खर्च होणारे जे पैसे आहेत त्यांतले फक्त थोडेच (तुम्ही जास्तही देऊ शकता –
त्यावर काही बंधन नाही J) तुम्ही या मंडळींना द्यायचे. त्यांतून काही
सुंदर पुस्तकं विकत घेऊन ते काही गरजू मुलांना देतील. त्यांची तुम्हाला भेटही
घडवून आणतील. तुम्हाला पुस्तकं द्यायची असतील तर तुम्ही पुस्तकंही देऊ शकता. मी
खाली संस्थेची माहिती दिली आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही तिथं जाऊन हे आनंदाचं
काम नक्की करावं.
Being Foundation
A-3/4, Nimbaj Nagar, Nr. Nirmal Township,
Sinhagad Road, Pune, Maharshtra. India
Reg. No.: Maha./377/2016/PUNE
A-3/4, Nimbaj Nagar, Nr. Nirmal Township,
Sinhagad Road, Pune, Maharshtra. India
Reg. No.: Maha./377/2016/PUNE
Account Name: Being Foundation
Account Number: 60246701066
Bank: Bank of Maharashtra
Branch: Pimplesaudagar (1443)
IFSC Code: MAHB0001443
MICR Code: 411014110
CREATE A SMILE: +919075091815 Pune 411027. (Maharashtra)
Account Number: 60246701066
Bank: Bank of Maharashtra
Branch: Pimplesaudagar (1443)
IFSC Code: MAHB0001443
MICR Code: 411014110
CREATE A SMILE: +919075091815 Pune 411027. (Maharashtra)
IMP Note: Once you gift the amount through net banking it is kind
request to all of you to
please share your details on below email ID. Name, PAN, Mobile, NEFT Details.
1book1smile@gmail.com
No comments:
Post a Comment